विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीला ममता, मायावती गैरहजर; आम आदमी पक्षानेही मारली दांडी

जामिया मिलिया विद्यापीठ आणि जेएनयूमधील हिंसाचाराच्या मुद्यावर केंद्र सरकारच्या विरोधी पक्षांची महत्वपूर्ण बैठक काँग्रेसने सोमवारी बोलावली आहे. मात्र, या बैठकीकडे आम आदमी पक्षासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी पाठ फिरवली आहे. महत्त्वाच्या प्रश्नावर एकी हवी असताना सरकारच्या विरोधकांमध्येच दुफळी निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे.

‘स्वतःची लायकी काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे’ ;जितेंद्र आव्हाड यांचा पंतप्रधान मोदींना टोला

”स्वतःची लायकी काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे.” अशा शब्दात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदींवर लिहलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.ते अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे बोलत होते.

.. मग पवारांना जाणता राजा म्हटलेलं कसं काय चालतं ? सुधीर मुनगंटीवार यांचा विरोधकांना सवाल

‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं भाजपला विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. या टीकेला उत्तर देताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार आता समोर आले आहेत. मुनगंटीवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष करत विरोधकांना प्रतिसवाल केला आहे. जाणता राजा ही जर छत्रपती शिवाजी महाराज याना दिली जात असेल तर शरद पवार यांना जाणता राजा म्हटलेलं तुम्हाला कसं काय चालतं ? अशी विचारणा करत विरोधांकाना प्रतिउत्तर दिलं. पवारांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळं त्यांना जाणता राजा ही उपाधी लागू होते का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. एका वृत्तवाहिनीवर त्यांनी ‘आज के शिवाजी’ या पुस्तकावरुन पक्षाची भूमिका मांडली.

स्वघोषित तुलनाकार जयभगवान गोयल यांच्या प्रतिमेला शिवसेनेने मारले जोडे

जय भगवान गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केल्यामुळे सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

”बिहारमध्ये NRC राबविण्याचा प्रश्नच नाही” – नितीश कुमार

NRC ची चर्चा फक्त आसामशी संबंधित होती असं म्हणत त्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NRC बद्दल केलेल्या विधानाचा आधार घेतला. त्यामुळे अमित शहा यांनी घेतलेल्या युटर्नला नितीश कुमारांकडून दुजोरा मिळाला आहे.

वजनदार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांच्या गळ्यात 500 किलोचा हार

हसन मुश्रीफ यांचा भव्य नागरी सत्कार करताना त्यांना ५०० किलोचा हार घालण्यात आला.

विरोधी पक्षांच्या बैठकीला ममता, मायावती गैरहजर, विरोधकांच्या एकीचे तीनतेरा

काँग्रेसने पुढाकार घेऊन नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी जनमत बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले असताना ममता आणि मायावती मात्र त्यासाठी अनुकूल दिसत नाहीत.

जेएनयूचे विद्यार्थी आंदोलनासोबत अभ्यासातही हुशार; IES परीक्षेच्या गुणवत्ता यादीत १८ ‘जेएनयू’कर

२०१९ मध्ये घेतलेल्या या परीक्षेत पूर्ण भारतातून फक्त ३२ विद्यार्थी निवडले जाणार होते. यातील १८ जागांवर जेएनयुने आपली छाप पाडली आहे.

योगी, मोदींविरुद्ध घोषणा द्याल तर जिवंत गाडू, भाजपचे मंत्री रघुराज सिंग यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाजपतर्फे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रघुराज सिंग यांनी मोदींविरुद्ध घोषणा द्याल तर गाडून टाकू अशी धमकी दिली आहे.

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? – संजय राऊत

मुंबई | भाजप नेते जय भगवान गोयल यांनी आज नरेंन्द्र मोदी यांच्या जीवणावरील एक पुस्तक भाजप कार्यालयात प्रकाशित केले. मात्र यामध्ये नरेंन्द्र मोदी यांची तुलना शिवजी महाराजांसोबत केल्याने वाद उफाळून आला आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आज के शिवाजी – नरेंन्द्र मोदी असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे विविध स्तरांतून सदर पुस्तकाचा निषेध नोंदवला जात आहे. शिवसेना … Read more