‘यूनिटी अगेन्स्ट लेफ्ट व्हाॅट्सॅप ग्रुपच्या सदस्यांची ओळख पटली, १० लोक कॅम्पसच्या बाहेरचे’

जेएनयू हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिस गुन्हे शाखेच्या SIT ने ‘यूनिटी अगेन्स्ट लेफ्ट’ नावाच्या व्हाॅट्सॅप ग्रुपच्या सदस्यांना ओळखलं आहे. या ग्रुपमध्ये एकूण ६० सदस्य होते. त्यापैकी ३७ लोकांना पोलिसांना ओळखण्यात यश आलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या सूत्रानुसार त्यातले १० लोक कॅम्पसच्या बाहेरचे होते. म्हणजे हिंसेमध्ये सामील असणारे हे १० लोक, त्यांचा कॅम्पसशी कुठलाच संबंध नाही. डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही गटांनी हिंसाचारात बाहेरच्या लोकांची मदत घेतली.

‘कामाची फाईल थांबली तर तुमची नोकरी थांबली’; मंत्री बच्चू कडूंची अधिकाऱ्यांना तंबी

“माझ्या खात्याच्या अंतर्गत येणारी कोणतीही फाईल विनाकारण थांबली तर त्या अधिकाऱ्याची नोकरी थांबली समजा ” अशा खड्या शब्दात राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु यांनी अधिकाऱ्यांना दम दिला. बच्चु कडु आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या विभागांची एकत्रित बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.

चांगली कामे करुन घेण्यात मी बाॅस – रोहित पवार

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी जामखेड मधील हळगाव येथील जनतेशी संवाद साधला. ‘मतदारसंघात विकास कामे चांगली होत नसतील तर तत्काळ मला कळवा. चांगले कामे करून घेण्यासाठीचा मी बॉस आहे. जो चांगली कामे करणार नाही त्याचा योग्य बंदोबस्त केला जाईल, असे आमदार रोहित पवार म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदार संघात … Read more

गुजरातमध्ये बलात्कारानंतर मुलीची निर्घृण हत्या

गुजरातमध्ये एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या नराधमांनी मुलीवर सामूहिक बलात्कारकरून तिची निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार नराधमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कन्हैय्याचा दिल्ली पोलिसांवर पक्षपाताचा आरोप

“दिल्ली पोलिसांनी जी पत्रकार परिषद घेतली ती दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद वाटतच नव्हती, ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पत्रकार परिषद वाटतच होती.” असा घणाघाती आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने दिल्ली पोलिसांवर केला.

‘साहित्याला जात-धर्म-पंथ नसतो’; ब्राह्मण महासभेने विरोध केलेल्या दिब्रिटो यांना शरद पवारांचा पाठिंबा

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला ब्राम्हण महासभेने विरोध केला आहे. त्यांची अध्यक्ष म्हणून केलेली निवड आम्हला मान्य नसल्याचे सांगण्यात येत असताना शरद पवार यांनी दिब्रिटो यांच्या अध्यक्ष म्हणून निवडीला पाठिंबा दिला आहे.

जेएनयुतील रुमची तोडफोड केल्याप्रकरणी हल्लेखोरांची ओळख पटली; आइशी घोषसह ९ जणांवर ठपका

गेल्या रविवारी जवाहरलाल विद्यापीठातील (जेएनयु) विदयार्थी आणि प्राध्यापकांवर झालेल्या हल्ल्यातील अज्ञात हल्लेखोरांची ओळख आम्हाला पटली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे. याबाबतचे फोटोही पुरावे म्हणून पोलिसांनी पत्रकार परिषदेत सादर केले. आम्ही आत्तापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेतलेलं नाही मात्र हल्लेखोर डाव्या संघटनांशी संबंधित होते असं गुन्हे अन्वेषण विभागाचे डीसीपी जॉय टिर्की यांनी पत्रकार परिषद म्हटलं आहे.

सरकारच्या अहंकारीपणाचा सर्वोच्च न्यायालयानेही धिक्कार केला : पी चिदंबरम यांचा केंद्र सरकारवर निशाणा

” जम्मू आणि काश्मीरच्या माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी या परिस्थितीची जबाबदारी घेऊन गोव्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला पाहिजे.”

‘भारत तेरे टुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांसोबत दीपिका उभी राहिली- स्मृती इराणी

जेएनयूतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर हल्ल्याच्या घटनेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हीने पाठिंबा दर्शवला होता. यावरुन तिला अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यात विशेषकरून भाजपसमर्थित नेते,मंत्री आणि बॉलिवूडच्या काही कलाकारांचा समावेश आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील दीपिकावर शरसंधान साधले आहे. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांसोबत उभी राहिली आहे आणि हा दीपिकाचा अधिकार आहे, अशा खोचक शब्दांत इराणी यांनी दीपिकावर टीका केली आहे. एका कार्यक्रमात उपस्थितीतांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ओढले ताशेरे; काश्मीरमध्ये इंटरनेट बंदी आणणं जाचक

सर्वोच्च न्यायालयात काश्मीरमध्ये इंटरनेट, मोबाइल निर्बंधाविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी आज पार पडली. न्यायमूर्ती एन व्ही रमणा, आर सुभाष रेड्डी आणि बी आर गवई यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने काश्मीरमधील निर्बंधांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर गतवर्षी २७ नोव्हेंबरला सुनावणी पूर्ण केली होती त्यावर आज निकाल देण्यात आला.