पणजी प्रतिनिधी | गोव्यात शिवसेना भाजपविरोधी लढणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना भाजपविषविरोधी लढणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती असली तरी, गोव्यात मात्र तसे चित्र दिसणार नसल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गोव्यात शिवसेना भाजपविरोधी दोन्ही निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उत्तर गोव्यात जितेश कामात तर दक्षिण गोव्यात राखी प्रभुदेसाई नाईक हे शिवसेनेच्यावतीने लढणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. मांद्रे विधानसभा मतदारसंघात शिवसेना निवडणूक लढणार आहे, त्यातही उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
सुभाष वेलींगकर यांच्या गोवा सुरक्षा मंच बरोबर युती करून शिवसेनेने मागील विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र या वर्षी गोवा सुरक्षा मंचाने आपले तिन्ही उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून सुवर्णमध्य सोडण्याचा प्रयत्न शिवसेना करणार असल्याचे राऊत म्हणाले.
इतर महत्वाचे –
सोलापूरातील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, ५० लाखांचा चेक केला परत
पादचाऱ्यास उडवून पळून जाणार्या पोलीस महानिरीक्षकांच्या गाडीस स्थानिकांनी पाठलाग करुन पकडले