राज्याला नवे गृहमंत्री मिळणार?? ‘या’ नेत्याचे नाव आघाडीवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून राज्याच्या गृहमंत्री पदावरून दिलीप वळसे पाटील यांना हटवले जाणार असल्याची चर्चा आहे. गृहखाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हातात गृहखात्याचा कारभार दिला जाण्याची शक्यता आहे. १ मे पूर्वी हा बदल होऊ शकतो. TV9 मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे

राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांवर ईडी कारवाई होत असताना गृहखात्या कडून म्हणावा तसा पलटवार भाजप नेत्यांवर केला जात नसल्याची तक्रार यापूर्वी देखील सरकारमधील नेत्यांकडून केली जात होती. तेव्हापासूनच गृहमंत्री पद दुसऱ्या कोणाला तरी देण्याबाबत चर्चा रंगल्या होत्या. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील यापूर्वीच गृहखात्याबाबत उघड नाराजी व्यक्त करत म्हंटल होत कि, गृहखात्याने दमदार पाऊले टाकली पाहिजेत, अस्ते कदम भूमिका घ्याल तर स्वतःभोवती तुम्ही फाशीचा दोर आवळत आहात असा इशारा त्यांनी दिला होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही एका कार्यक्रमात बोलताना म्हंटल होत की , वळसे पाटील साहेब, गृहखात्याचा हिसका दाखवा आणि भाजपच्या २-४ नेत्यांना तुरुंगात टाका, आधीच हे काम केलं असत तर आज परिस्थिती आली नसती असे म्हणत त्यांनी वळसे पाटलांचे कान टोचले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता गृहमंत्री बदलाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत.

हे पण वाचा –

बेवकूफ… रेस का सिंकदर मैं हूं! छ. उदयनराजेंचा हटके अंदाज पुन्हा चर्चेत

PPF आहे खूपच कामाची गोष्ट, कर्जही मिळतं अन टॅक्स मध्ये सूटदेखील; जाणून घ्या या 10 गोष्टी

धनंजय मुंडेंना धमकी देणाऱ्या ‘त्या’ महिलेला अटक; दुसरी तिसरी कोणी नसून…..

सारा तेंडुलकरचे लग्नातील फोटो व्हायरल; मराठमोळा लूक पहाच राधिका आपटेच्या पोटाला जखम? व्हिडीओमुळे चाहते हैराण रतन टाटा थरथरत स्टेजवर पोहोचले अन म्हणाले उरलेलं आयुष्य गरिबांच्या आरोग्यासाठी काम करणार या भारतीय क्रिकेटर्सचा अभिनेत्रींनवर जडला जीव; मागे फिरून झालेले वेडे… मौनी रॉयनं वाढवलं इंटरनेटवरचं तापमान; बिकिनी फोटो पाहून म्हणाल…