हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local Train) ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे लाखो नागरिक लोककने प्रवास करतात. प्रवाश्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी लोकल नेहमीच प्रयत्नशील असते. मात्र तरीही लोकलची गर्दी ही आटोक्यात येत नाही. मुंबई लोकलच्या गर्दीचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. त्यामुळे लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी मध्य रेल्वेने शून्य मृत्यू मोहीम हाती घेतली आहे. त्याद्वारे मुंबई महानगरातील कार्यालयीन वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सर्वात अगोदर सकारात्मक भूमिका घेण्याचे काम मुंबईच्या पोस्ट मास्तर (Post Office) खात्याने घेतली आहे. 2023 मध्ये ही भूमिका या खात्याने साकारली होती. आता याच निर्णयास प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी एका ठराविक वेळेतच असलेल्या गर्दीला समोर ठेवत या वेळेमध्ये बदल करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेने 500 संस्थांना दिले होते निवेदन
2023 च्या नोव्हेंबर मध्ये लोकलच्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी शून्य मृत्यू मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार लोकलच्या कार्यालयीन वेळेतच बदल करण्यासाठी मध्य रेल्वेने 500 संस्थांना निवेदन दिले होते. त्यानुसार मुंबईच्या टपाल मुख्याल्याने कामाकाजाच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्याद्वारे आता एकूण तीन पाळीमध्ये हे कामकाज चालत आहे. यांमध्ये सकाळी 8 ते 4, सकाळी 9 ते 5 आणि सकाळी 10 ते 6 असे याचे वेळापत्रक आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगत असलेल्या टपाल कार्यालयात एकूण 115 अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यांच्या कामाचा वेळ हा सकाळी 9:30 ते 6 वाजेपर्यंत आहे.
किती आहेत मुंबई महानगरात कार्यालये
मुंबई महानगरात एकूण 562 टपाल कार्यालये आहेत. त्यामध्ये मुंबई उत्तर विभागात 36, मुंबई दक्षिण विभागात 27, मुंबई पूर्व विभागात 36, मुंबई पश्चिम विभागात 44, मुंबई उत्तर पश्चिम विभागात 33, मुंबई जीपीओत एक, मुंबई उत्तर पूर्व विभागात 53, ठाणे विभाग 199 आणि नवी मुंबई विभागात 133 टपाल कार्यालये आहेत. या कार्यालयाच्या वेळेत बदल केल्यानंतर लोकल ट्रेनच्या गर्दीला नियंत्रणात आणणे सोपे होईल अशी आशा आहे.