हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून लोकांसाठी अनेक योजना चालविल्या जातात. विशेषतः त्यांच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये गुंतवणूकदार जास्त रस घेतात. पोस्ट ऑफिसच्या अशा योजनांमध्ये जोखम देखील कमी असते. तसेच यावरील व्याज दर देखील जास्त असतो. याशिवाय यावर सरकार कडून गॅरेंटी देखील मिळते. मात्र इथे हे लक्षात घ्या कि, पोस्ट ऑफिसच्या या योजनांचे व्याजदर गेल्या अनेक दिवसांपासून वाढवले गेलेले नाहीत.
नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC), सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) सारख्या योजनांचा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये समावेश होतो. एका मीडिया रिपोर्ट्स मध्ये असे सांगण्यात आले आहे कि, सरकार आता या योजनांचे व्याजदर वाढविण्याचा विचार करत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून व्याजदरात वाढ करण्यात आलेली नाही
हे लक्षात घ्या कि केंद्र सरकारकडून दर तीन महिन्यांनी या योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेतला जातो. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून यावरील व्याजदरात वाढ करण्यात आलेली नाही. मार्चमध्ये झालेल्या आढाव्यातही हे दर बदलले गेले नाहीत. आता जूनमध्ये पुढील आढावा घेतला जाईल. Post Office
दरात वाढ होऊ शकेल
एकीकडे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी RBI कडून या महिन्यात रेपो दरात अचानक 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व प्रकारची कर्जे महागली आहेत. तर दुसरीकडे, गुंतवणूकदारांना यापेक्षा जास्त रिटर्न मिळू लागला आहे. सर्व सरकारी आणि खाजगी बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्स (FD) आणि रिकरिंग डिपॉझिट्सच्या (RD) व्याजदरात वाढ केली आहे. ज्यामुळे आता या योजनांचे व्याजदर वाढवण्यासाठी सरकारवर दबाव आला आहे. Post Office
अशा योजनांमध्ये गुंतवलेला पैसा सरकार कडून अनेक पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विविध योजनांमध्ये वापरला जातो. जर बँकांचा व्याजदर या योजनांपेक्षा जास्त असेल तर गुंतवणूकदार त्यामधून पैसे काढून घेतील आणि बँकांमध्ये गुंतवतील. ज्यामुळे सरकारकडे भांडवलाची कमतरता निर्माण होऊ शकेल. याच कारणामुळे आता सरकाकडून या अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. Post Office
विविध बचत योजनांचे सध्याचे दर
PPF – 7.1%
नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC) – 6.8%
सुकन्या समृद्धि योजना – 7.6%
किसान विकास पत्र – 6.9%
पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट – 4%
1-3 वर्षांपर्यंत FD – 5.5%
5 वर्षांपर्यंत FD – 6.7%
RD 5 वर्षांपर्यंत – 5.8%
ज्येष्ठ नागरिक बचत योजना – 7.४%
5 वर्षांसाठी मंथली इन्कम स्कीम – 6.6%
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/
हे पण वाचा :
आता Aadhaar Card द्वारे अशाप्रकारे करा ITR चे ई-व्हेरिफिकेशन !!!
EPF किंवा EPS मध्ये ऑनलाइन नॉमिनेशन कसे करावे ??? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
SBI YONO App : आता ग्राहकांना डिजिटल माध्यमाद्वारे मिळणार लोन !!! नवीन सुविधेविषयी जाणून घ्या
Investment : वाढत्या महागाईमध्ये मुलांच्या भविष्यासाठी अशाप्रकारे करा गुंतवणूक !!!