पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसलेंना सीबीआयकडून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना सीबीआयने नुकतीच अटक केली आहे. अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीएचएफल प्रकरणात अविनाश भोसले (Avinash Bhosale)यांना हि अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआय अविनाश भोसले यांच्या मागावर होती. ईडीनं यापूर्वी फेमा कायद्यांअंतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. सीबीआयने काही दिवसांपूर्वी अविनाश भोसले यांच्या घरी छापे टाकले होते.

ईडीनं गेल्यावर्षी अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त केली होती. डीएचएफएल प्रकरणात सीबीआयकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. येस बँक आणि डीएचएफएल बँक गैरव्यवहार प्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांचे घर आणि काही मालमत्तांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने छापे टाकून महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. याच घोटाळ्यासंदर्भात व्यावसायिक संजय छाब्रिया यांना देखील अटक करण्यात आली होती. भोसले यांच्यासह विनोद गोएंका आणि शाहीद बालवा यांच्यावरसुद्धा सीबीआयकडून कारवाई करण्यात आली आहे.

यापूर्वी गेल्या वर्षी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भोसले (Avinash Bhosale)आणि त्यांच्या कुटुंबाची जवळपास 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. येस बँक आणि डीएचएफएल बँक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई झाली असून मुंबई आणि पुण्यात आठ ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहेत. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. तसेच ते कोट्यवधी रुपयांच्या ABIL चे सर्वेसर्वा आहेत.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

Leave a Comment