हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Post Office : सध्याच्या काळात लोकं गुंतवणूकीबाबत खूपच सजग झाली आहेत. लोकांना आपली गुंतवणूक सुरक्षित राहण्या बरोबरच चांगला नफा देखील हवा असतो. जर आपल्यालाही अशा प्रकारे गुंतवणूक करायची असेल Post Office ची रिकरिंग डिपॉझिट स्कीम आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल. कारण या योजनेमध्ये नावनोंदणी केल्याच्या अवघ्या दहा वर्षातच 16 लाख रुपयांहून जास्तीचा फंड जमा करता येऊ शकतो. याव्यतिरिक्त, यामध्ये केलेली गुंतवणूक ही जोखीममुक्त देखील आहे.
किती गुंतवणूक करावी लागेल ???
Post Office च्या या स्कीममध्ये दरमहा 10,000 रुपये जमा करावे लागतील. हे जाणून घ्या कि, यामध्ये फक्त 100 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरु करता येऊ शकते. यामध्ये आपले पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच चांगला नफा देखील मिळू शकेल. या योजनेची खास बाब अशी कि, या योजनेतून 5 वर्षांनंतर कधीही पैसे काढता येतात. मात्र, ही रक्कम 10 वर्षांनीच मॅच्युर होईल. सध्या या योजनेवर 5.8 टक्के व्याजदर दिला जातो आहे.
10 वर्षांनंतर मिळतील इतके पैसे
या योजनेमध्ये दरमहा 10 हजार रुपये जमा केल्यास 10 वर्षांत 12 लाख रुपये जमा होतील. ज्यावर Post Office कडून वार्षिक 5.8 टक्के व्याजदर दिला जाईल. यानंतर मॅच्युरिटीवर 16,26,476 रुपये मिळतील. तसेच, जर आपण मॅच्युरिटीआधीच म्हणजे 5-वर्षांपूर्वी पैसे काढले, तर पेआउट कमी असेल. इथे लक्षात घ्या कि, या योजनेमध्ये सलग 4 महिने गुंतवणूक केली नाही, तर आपले खाते बंद केले जाईल. तसेच नंतर पुन्हा सुरू करण्यासाठी दंड भरावा लागेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता