हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : जर आपण पैसे गुंतवण्यासाठी सुरक्षित पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना आपल्यासाठी योग्य ठरू शकतात. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित तर असतेच आणि सरकारच्या पाठिंब्यामुळे त्या जोखीममुक्त देखील आहेत.
आपल्याला पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये गुंतवणूक करता येईल. ही एक चांगली छोटी बचत योजना आहे. जी देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून सुरू करता येईल. तसेच त्याच्या मॅच्युरिटीचा कालावधी 5 वर्षे असेल. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेउयात… जेणेकरून पैशाच्या गुंतवणुकीबाबत निर्णय घेणे सोपे जाईल. Post Office
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट विषयी जाणून घ्या
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) मध्ये गुंतवणूक करून वार्षिकरित्या 6.8 टक्के व्याज मिळेल. जे बँकांच्या एफडीपेक्षा जास्त आहे. तसेच यामध्ये 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. याबरोबरच,यामध्ये जास्तीच्या गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा देखील नाही. म्हणजेच यामध्ये आपल्याला हवे तितके पैसे गुंतवता येतील. यासोबतच 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्यांतर्गत टॅक्स सूट देखील मिळेल. यामध्ये 100, 500, 1000, 5000, 10,000 किंवा त्याहून जास्तीचे सर्टिफिकेट खरेदी करता येतात. कोणतीही प्रौढ व्यक्ती आपल्या मुलासाठी हे सर्टिफिकेट घेऊ शकते. Post Office
किती रिटर्न मिळेल ???
जर NSC मध्ये 10 लाख रुपये गुंतवले आणि 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीत वार्षिक 6.8 टक्के रिटर्न मिळेल. ज्यानुसार चक्रवाढ व्याजाद्वारे ही रक्कम 14 लाख रुपये होईल. Post Office
कोणा- कोणाला गुंतवणुक करता येऊ शकेल ???
NSC मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान 10 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. मात्र, या खात्याचे नियंत्रण मुलाच्या पालकांकडे राहील. तसेच मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर हे खाते त्याला वापरता येईल. यामध्ये 18 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या कोणत्याही भारतीय नागरिकाला गुंतवणूक करता येईल. यामध्ये जॉईंट अकाऊंटची सुविधाही दिली जाते. NSC चे जॉईंट अकाऊंट 3 लोकांसोबत उघडता येईल. Post Office
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=90
हे पण वाचा :
Gold Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या स्पॉट किंमतीत जोरदार वाढ, आजचे दर पहा
Share Market पैसे गुंतवत असाल तर टॅक्सशी संबंधित ‘हे’ नियम जाणून घ्या
Senior Citizen Savings Scheme द्वारे वृद्धांना दरवर्षी मिळतील लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या
FD Rates : आता ‘या’ 2 बँकांनी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याजदर तपासा