हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगला रिटर्न देणारी Post Office ची सीनियर सिटीजन स्कीम एक चांगला पर्याय ठरू शकेल. पोस्ट ऑफिस कडून दिल्या जाणाऱ्या या स्कीममध्ये आपले पैसे तर सुरक्षित राहतीलच त्याचबरोबर यामध्ये बँकेपेक्षा जास्त रिटर्न देखील मिळेल.
हे जाणून घ्या कि, Post Office च्या या स्कीम अंतर्गत आपल्याला फक्त 1000 रुपयांमध्ये खाते उघडता येईल. यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. तसेच या योजनेतील गुंतवणूकीवर आपल्याला आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट देखील मिळवता येईल.
या योजनेतील ग्राहकांना Post Office कडून 7.4 टक्के व्याजदर दिला जातो. यामध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. या योजनेत 10 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास 5 वर्षानंतर 7.4 टक्के दराने 14,28,964 रुपये रिटर्न मिळेल.
Post Office च्या या योजनेमध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना गुंतवणूक करता येईल. तसेच 55 वर्षांवरील मात्र 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या सेवानिवृत्त नागरी कर्मचारी सेवानिवृत्तीचा लाभ मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत गुंतवणूक करू शकतात. त्याचबरोबर 50 वर्षांवरील मात्र 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे निवृत्त संरक्षण कर्मचारी देखील सेवानिवृत्ती लाभ मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत गुंतवणूक करू शकतात.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
WhatsApp द्वारे Android फोनवरून टायपिंग न करता पाठवा मेसेज !!!
Voter ID मधील घराचा पत्ता कसा बदलावा हे समजून घ्या
PM Kisan च्या 11 वा हफ्त्याचे पैसे मिळवण्यासाठी ‘या’ नंबर करा तक्रार !!!
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिला 960 टक्के रिटर्न !!!
LPG price : सिक्योरिटी डिपॉझिट्समध्ये वाढ झाल्याने कमर्शिअल LPG कनेक्शन महागले !!!