हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Post Office मध्ये गुंतवणुकीसाठी अनेक लहान बचत योजना उपलब्ध आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करता येईल. पोस्ट ऑफिसची पीपीएफ योजना देखील यापैकीच एक आहे. याद्वारे आपण 15 वर्षात 10 लाख रुपयांपर्यंतचा फंड जमा करू शकाल. मात्र, त्यासाठी फक्त 3000 हजार रुपये दरमहा गुंतवावे लागतील. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ योजनेसाठी 7.1 टक्के व्याज दिले जात आहे.
देशातील जवळपास प्रत्येक शहरात आणि गावात पोस्ट ऑफिसच्या अनेक शाखा आहेत. आता तर Post Office मध्ये इंटरनेट बँकिंगची सुविधा देखील सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे भारत सरकार भारतीय पोस्ट ऑफिस चालवत असल्याने यामध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षितही राहते. ज्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये केलेली गुंतवणूक बुडण्याची भीती देखील नसते.
अशा प्रकारे 15 वर्षात मिळवा 10 लाख रुपये
जर आपण Post Office मध्ये दरमहा 100 रुपयांची बचत करून ते मासिकरित्या PPF स्कीममध्ये 3000 रुपये गुंतवले तर 15 वर्षांत आपल्याकडे 9,76,370 रुपयांचा फंड जमा होईल.
दरमहा 3 हजार रुपयांनुसार, एका वर्षात एकूण 36 हजार रुपये जमा करून 15 वर्षांत 5,40,000 रुपये जमा होईल.
या रकमेवर 7.1 % दराने व्याज मिळेल, जे 15 वर्षांत 4,36,370 रुपये होईल.
या प्रकरणात, तुमच्याकडे व्याज आणि मुद्दल यांचा समावेश करून 15 वर्षांत एकूण 9,76,370 रुपयांचा फंड जमा होईल.
कर सवलतही मिळेल
हे जाणून घ्या कि, PPF ला इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील मिळतो. यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी डिडक्शन मिळवता येते. PPF मध्ये मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम देखील टॅक्स फ्री आहे. अशा प्रकारे PPF मधील गुंतवणूक EEE श्रेणीत येते. Post Office
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता