मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील पवई येथे असलेल्या हिरानंदानी येथील एका इमारतीला आग (fire) लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे (fire)भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र लाखो रुपयांचं सामना या आगीत जळून खाक झाले. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती.
भर पावसात हिरानंदानी येथील सुपरमार्केटला लागली भीषण आग, लाखों रुपयांचे झाले नुकसान pic.twitter.com/kFz1tUPqay
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 8, 2022
पवईच्या हिरानंदानी येथील हायको सुपरमार्केटमध्ये ही आग लागली होती. सव्वा सहा वाजता आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. त्यानंतर आगीवर (fire) नियंत्रण मिळवणारे बंब आणि 9 गाड्या घटनास्थळी आग (fire) विझवण्यासाठी रवाना झाल्या होत्या. हायको सुपरमार्केटमध्ये लागलेल्या आगीत सुदैवानं कुणीही अडकलं नव्हतं. तसंच कोणतीही जीवितहानी या आगीत झालेली नाही. मात्र लाखो रुपयांचं नुकसान या आगीमध्ये झालं आहे. तसंच सुपरमार्केटचाही कोळसा झालाय. नेमकी ही आग कशामुळे लागली, हे कळू शकलेलं नाही.
भर पावसात अग्नितांडव
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ऐन पावसात पवईत आगीची घटना घडल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, आग (fire) लागल्यानं सुरु असलेल्या बचावकार्याचा फटका या मार्गावरील वाहतुकीला बसला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार