हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. शिवसेनेच्या 102 दिवस तुरुंगात असलेल्या खा. संजय राऊत यांची नुकतीच सुटका झाली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट पुन्हा चार्ज झाला आहे. ठाकरे गटाकडून आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. अशात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती होण्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकचा मंचावर एकत्र येणार आहेत.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शिवाजी मंदिरमध्ये प्रबोधन डॉट कॉम या संकेतस्थळाचे येत्या 20 नोव्हेंबरला लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघे एकत्र येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांबाबत एकमेकांशी उटी करण्याबरोबर काही महत्वाच्या विषयावर चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, निवडणूक आल्यावर राजकीय समीकरणे घडतील. इलेक्शन नाही तोपर्यंत असेच चालेल. सध्या तरी युती आणि आघाडी करावी या संदर्भात कुणालाच उत्सुकता नाही, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.