मुंबई प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत देखील लोकसभा उमेदवारांच्या यादी प्रमाणे जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. तर एमआयएम सोबत पुन्हा संधान नबंधता विधानसभेच्या सर्व जागा वंचित लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे.
एमआयएमने वंचित सोबत काडीमोड घेतल्यानंतर आपने वंचित सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वंचित आघाडीने त्यांना योग्य जागांची हमी दिल्याने आपने देखील त्यांच्या पासून फारकत घेतली आहे. त्यामुळे वंचित आघाडी स्वबळावरच सर्व जागा लढण्याच्या तयारीत आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत २२ जागांचा समावेश असून संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा या निमित्ताने वंचित आघाडीने केली आहे.
वंचित आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ
१. सुरेश जाधव, शिराळा
२. डॉ आनंद गुरव, करवीर
३. दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर
४. बाळकृष्ण शंकर देसाई, द. कराड
५. डॉ बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव
६. दीपक शामदिरे, कोथरूड
७. अनिल कुऱ्हाडे, शिवाजीनगर
८. मिलिंद काची, कासबपेठ
९. शहानवला जब्बारशेख, भोसरी
१०. शाकिर इसालाल तांबोळी, इस्लामपूर
११. किसन चव्हाण, पाथर्डी शेवगाव
१२. अरुण जाधव, कर्जत जामखेड
१३. सुधीर शंकरराव पोतदार, औसा
१४. चंद्रलाल मेश्राम, ब्रह्मपुरी
१५. अरविंद सांडेकर, चिमूर
१६. माधव कोहळे, राळेगाव
१७. शेख शफी अब्दुल नबी शेख, जळगाव
१८. लालूस नागोटी, अहेरी
१९. मणियार राजासाब, लातूर शहर
२०. नंदकिशोर कुयटे, मोर्शी
२१. ऍड आमोद बावने, वरोरा
२२. अशोक गायकवाड, कोपरगाव