भंडारा । प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रणामध्ये दाह वाढत चालला असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात बघायला मिळते आहे.अशातच नरेंद्र मोदी यांच्यावर प्रकाश आंबेडकरांनी आज निशाणा साधला आहे. जो स्वतःच्या पत्नीला न्याय देऊ शकतला नाही तो तुम्हाला काय न्याय देणार असे प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले आहेत.
भंडारा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकर यांनी जनतेशी संवाद साधला आहे. देशात आपण असा पंतप्रधान निवडून दिला आहे की जो स्वतःच्या पत्नीला न्याय देऊ शकतला नाही तो आता तुम्हा आम्हाला काय न्याय देणार असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले आहे. व्यक्ती आपल्या मुलाशी, मुलीशी आणि पत्नीशी कसा वागतो यावर त्याचे परिवारातील स्थान ठरते आणि त्याच्या परिवारातील स्थानावरच त्याचे समाजातील स्थान ठरते असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी असुवद्दीन ओवीसी यांच्या एमआयएम पक्षाला सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. काँग्रेसने पुढे केलेला आघाडीचा हात धुडकावून प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ४८ ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांचा तोटा भाजपापेक्षा काँग्रेसला अधिक होणार आहे. कारण काँग्रेसचा मुस्लिम आणि दलित हा हक्काचा मतदार वंचित बहुजन आघाडीकडे वळाला आहे.