हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी उडाली असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला आहे. टिपू सुलतान प्रकरणात भाजपच तोंडघशी पडलं आहे असं त्यांनी म्हंटल.
भाजपकडे अँटी मुस्लिम शिवाय दुसरा अजेंडा नाही आणि त्यांनी त्याला सुरुवात केलेली आहे. तेव्हा हा मुद्दा फार चालेल मला असं वाटत नाही. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल. टिपू सुलतान आपले राज्य वाचवता वाचवता शहीद झाला हा इतिहास लोकांच्या समोर आहे. त्यामुळे टिपू सुलतान ब्रिटिशांच्या विरोधात लढत होता एवढेच सिद्ध झालं आहे आणि हेच लोक मानतात असेही त्यांनी म्हंटल.
दरम्यान, पेगसीस प्रकरणावरूनही त्यांनी मोदी सरकार वर तोफ डागली.केंद्र शासनाने पेगासस विकत का घेतलं आणि विकत घेऊन त्यांनी कुठल्या इंडियन इंटेलिजन्स एजन्सीला वापरायला ती दिलेलं आहे याची माहिती देखील समोर आलेली नाही. सुप्रीम कोर्टाने ते केलं नाही. कोर्टानं या प्रकरणी कमिशन नेमले ते कमिशन आता काही उत्तरचं देत नाही, अशी परिस्थिती आहे असे आंबेडकर म्हणाले.