अकोला । लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लॉकडाऊन उठवण गरजेचं असून ३१ जुलैनंतर लॉकडाउन वाढवला जाऊ नये असं मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. याशिवाय ३१ जुलैनंतर लॉकडाउन वाढवला तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. यावेळी आपली माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे. अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, “पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम असून आता लॉकडाउन मोडावा लागेल. ३१ जुलैनंतर राज्यात लॉकडाउन वाढवला जाऊ नये अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन विरोध करु. सरकारने गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवू नये. माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी आहे”.
लोकांना लॉकडाउनमुळे होत असलेल्या मानसिक त्रासाची जाणीव झाली आहे. सरकारने लोकांच्या वागणुकीवरुन परिस्थिती समजून घ्यावी असंही ते म्हणाले आहेत. राज्य सरकारने आमदार, खासदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींची कोरोना चाचणी करावी. चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्यांना क्वारंटाइन करावं, मात्र चाचणी निगेटिव्ह येणाऱ्यांना फिरायला रानमोकळं करा असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”