हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमध्ये १०० पेक्षा अधिक जागा जिंकू शकत नाही असा अचूक अंदाज सांगणारे आणि भाजप जिंकल्यास निवडणूक रणनीतीकार म्हणून करत असलेलं काम थांबवेन, अशी घोषणा करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी आता सगळ्यांनाच धक्का दिला आहे. बंगाल निवडणूक संदर्भात किशोर यांचा अंदाज खरा ठरत असताना, त्यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून करत असलेलं काम थांबवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडेशी चर्चा करताना ही माहिती दिली आहे. आता निवडणूक रणनीती बनविण्याचं काम मी सोडणार आहे, असं त्यांनी सांगितलं. मात्र, पुढे काय करणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही. ममता बॅनर्जी याच बंगालमध्ये सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या विजयामागे प्रशांत किशोर यांचं मोठं योगदान आहे. बंगालमध्ये भाजप ट्रिपल डिजीट म्हणजे तीन आकडी संख्या गाठणार नसल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलं होतं. त्यांचं हे भाकीत खरं ठरताना दिसत आहे.
तुम्ही राजकारणात जाणार का, असा सवाल किशोर यांना विचारण्यात आला. त्यावर किशोर यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. राजकारणात जातोय किंवा जात नाहीए याबद्दल मी काहीच बोलत नाहीए. पण आता करत असलेलं काम थांबवत आहे. आयपॅकमधील माझ्या सहकाऱ्यांनी आता आयपॅकची जबाबदारी घ्यावी. मी आता ब्रेक घेत आहे. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे, असं किशोर यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.