हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यासह मुंबई व उपनगरात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवरून विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “चेंबूरमध्ये भिंत कोसळून,विक्रोळीत घर कोसळल्याने जीवितहानी झाली.काही जखमी झाले. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली ! असे हकनाक बळी अजून किती दिवस जाणार आहेत?’ असे ट्विटकरीत दरेकर यांनी सवाल उपस्थित केला आहे.
भाजपनेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर अनेकवेळा टीका केली जाते. त्यांनी आज मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याने 17 जणांचा मृत्यू झालयाच्या घडलेल्या दुर्घटनेवर ट्विट केले आहे.
चेंबूरमध्ये भिंत कोसळून,विक्रोळीत घर कोसळल्याने जीवितहानी झाली.काही जखमी झाले. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!💐
आम्ही बोललो कि राजकारण करतो, असे म्हणाल, परंतु पावसाळा आला कि, असे हकनाक बळी अजून किती दिवस जाणार आहेत?
प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या घटना घडतायत!— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 18, 2021
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, चेंबूरमध्ये भिंत कोसळून,विक्रोळीत घर कोसळल्याने जीवितहानी झाली.काही जखमी झाले. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली ! आम्ही बोललो कि राजकारण करतो, असे म्हणाल, परंतु पावसाळा आला कि, असे हकनाक बळी अजून किती दिवस जाणार आहेत? प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या घटना घडतायत !”
मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. तर काही ठिकाणी जीर्ण झालेल्या इमारतींचा भागही कोसळून नागरिक मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत. आता या घटनांना राज्य सरकारला जबाबदार धरत भाजपकडून हल्लाबोल केला जात आहे.