नवाब मलिक हे हिंदू द्वेष्टी; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी उडाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टिपू सुलतान हे स्वातंत्र्यसेनानी होते अस म्हंटल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मलिकांवर निशाणा साधला. नवाब मलिक हे हिंदू द्वेष्टी आहेत अशी टीका त्यांनी केली.

नवाब मलिक यांच्याकडून दुसरी कोणती अपेक्षा नाही. मुळातच ते मुस्लिम असल्याने हिंदू द्वेष्टी आहेत. त्यांच्या नसानसात हिंदू द्वेष भरला आहे अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. मराठा समाजाचे साम्राज्य नष्ट करणाऱ्या टिपू सुलतान बाबत राष्ट्रावादी काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करावी असे आव्हान दरेकर यांनी दिले.तसेच राष्ट्रपतीनी टिपू सुलतानचा कोणताही गौरव केला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले-

टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी होते. ते ब्रिटिशांना कधीही शरण गेले नाहीत. ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी त्याकाळी हादरवून सोडले होते, असे मलिक म्हणाले. मुंबईतील एका मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव दिले म्हणून त्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजप करत आहे. असा आरोप मलिकांनी केला होता.