हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर अनेक घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. दरम्यान त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार याच्यावर निशाणा साधला आहे. “जय पवार यांचे कारनामे मी लवकरच उघड करून बाहेर काढणार असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची १०५५ कोटींची संपत्ती बेनामी घोषित झाली आणि जप्त झाली. आता पुढे काय होते ते सर्वांनी पहावे. मी आता अजित पवार यांचा मुलगा जय पवार याने काय कारनामे केलेत, ते लवकरच बाहेर येतील. त्याचेही कारनामे मी बाहेर काढणार आहे.
सोमय्या यांनी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्यासंदर्भात अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. बेनामी गुंतवणूक करून, कंपन्यांचे जाळे निर्माण करत उपमुख्यमंत्री पवार यांनी कारखान्याची खरेदी केली. आणि एवढेच नव्हे तर सर्व नियमांचे उल्लंघन करून पवार यांनी स्वत:च हा कारखाना स्वत:ला विकला, असा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. अजित पवारानंतर आता जय पवार यांच्याकडे सोमय्या यांनी मोर्चा वळवला आहे.