हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजप आणि शिवसेना मधील दरी आणखी वाढत चालली आहे. मुंबईत शिवसेनाच दादा आहे असं विधान खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. शेवटी जनता निवडणुकीत कोण दादा आहे ते ठरवत असते असा टोला त्यांनी लगावला.
प्रवीण दरेकर म्हणाले, शेवटी जनता निवडणुकीत कोण दादा आहे ते ठरवत असते. लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल मुंबईतील जनतेने भाजपाला भरभरुन प्रेम आणि आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यांच्या दादागिरीला चाप लावला आहे असे प्रवीण दरेकरांनी म्हंटल.
शेवटी जनता निवडणुकीत कोण दादा आहे ते ठरवत असते. लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल मुंबईतील जनतेने भाजपाला भरभरुन प्रेम आणि आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यांच्या दादागिरीला चाप लावला आहे.@BJP4Maharashtra @BJP4Mumbai #BJP4Maharashtra #BJP pic.twitter.com/7VWzbMQ0FF
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) February 10, 2022
ते पुढे म्हणाले, संजय राऊत किंवा शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नाही. या महाराष्ट्रात अनेक पक्ष, अनेक नेते आहेत. प्रत्येक नागरिकाचा महाराष्ट्रावर अधिकार आहे, त्यामुळे महाराष्ट्र म्हणजे आपल्या कुणाची खासगी मालमत्ता असल्यासारखे बोलण्याचे कारण नाही.