Wednesday, October 5, 2022

Buy now

25 वर्षे युतीत सडली तर मग दोन वर्षात शिवसेना वाढली का? दरेकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना भाजपवर तोफ डागली. शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल्यांतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. तुमची 25 वर्षे भाजपसोबत सडली तर मग दोन वर्षात शिवसेना वाढली का? असा सवाल दरेकरांनी केला.

प्रविण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. तुमची 25 वर्षे भाजपसोबत सडली तर मग दोन वर्षात शिवसेना वाढली का? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला. मुख्यमंत्री त्यांचा असूनही निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली का ?? सरकार असूनही आपली वाढ का होत नाही? याचं आत्मपरीक्षण करा असे दरेकरांनी म्हंटल.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले-

शिवसेनेची गेली 25 वर्ष भाजप सोबत युती होती. आपली 25 वर्ष युतीमध्ये सडली. माझं आजही तेच मत आहे. मी माझ्या मतावर ठाम आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल. बाळासाहेब म्हणायचे की राजकारण हे गजकर्णासारखं आहे, जेवढं खाजवावं तेवढी अधिक खाज येतं. तसे हे सगळे राजकारणातील गजकर्णी आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.