मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर खेळी : मुंबई पालिकेचे आयुक्त म्हणून प्रवीण परदेशींची नियुक्ती

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |शिवसेना भाजप यांच्यात वादाची पहिली ठिणगी म्हणून गणली गेलेली मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजपने अद्याप डोक्यात ठेवली आहे. म्हणूनच एक निकटवर्तीयअधिकारी बडतीवर जाताच दुसरा निकटचा अधिकारी भाजपने मुंबई पालीकीचा आयुक्त म्हणून नेमला आहे. अर्थात अजोय महेता यांची मुख्य सचिव पदी निवड होताच मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रवीण परदेशी यांची मुंबई पालिका आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या चारा छावणीतील भ्रष्टाचार उघड

शिवसेनेच्या पालिका कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ साली अजोय मेहता यांची नेमणूक केली होती.कडक शिस्तीचे मेहता आणि शिवसेना नेते यांच्यात बऱ्याच वेळा कलह निर्माण झाले होते.मात्र पालिकेला स्वच्छ राखण्यात मेहता यांनी महत्वाची भूमिका पार पडली होती.आता त्यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी नेमणूक झाल्यामुळे त्यांच्या जागी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती केली आहे.

युती अंतर्गत वाद आणि राज फॅक्टरमुळे सेनाभाजपच्या तब्बल १६ जागा धोक्यात

१९८५सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी असणारे परदेशी देखील मेहता यांच्या प्रमाणे कर्तव्य कठोर आहेत. प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.त्यामुळे त्यांची या महत्वाच्या पदी निवड केली गेल्याचे देखील बोलले जाते आहे. एकंदरच शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा मोठी खेळी खेळल्याचे बोलले जाते आहे.