Corona Impact | सोशल मीडियावर मेसेज पोस्ट आणि फॉरवर्ड करण्याआधी ‘या’ सूचना नीट लक्षात घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र | देशभरात कोरोना विषाणूने थैमान माजवलेलं असताना सोशल मीडियावरुन लोकांमध्ये भीती आणि अफवा पसरवण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. संचारबंदीच्या काळात सामान्य जनता, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने घेतलेल्या कष्टांवर जर सोशल मीडियातल्या अफवांचा परिणाम होणार असेल तर त्याबाबत खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाच्या सायबर सेलकडून सांगण्यात आलं आहे. यानुसार काही खबरदारीच्या सूचना घेण्याबद्दल एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

राज्य पोलीस दलातर्फे जारी करण्यात आलेली
अधिकृत माहिती पत्रिका

कोरोनाच्या संकटकाळात, व्हॉट्सअपसारख्या पटकन संदेश पाठवल्या जाणाऱ्या व्यासपीठांवरून अनेक खोट्या बातम्या, चुकीची माहिती आणि तिरस्कृत संदेश पसरवले जात आहेत. व्हॉट्सअपच्या ग्रुप सदस्यांनी आणि प्रमुखांनी पाळायचे नियम खालीलप्रमाणे आहेत.

तुम्ही व्हॉट्सअप समूहाचे सभासद असताना काय केले पाहिजे?

१) कोणतीच खोटी बातमी, तिरस्कृत भाषण किंवा चुकीची माहिती ग्रुपवर पोस्ट करू नका.

२) दुसऱ्या एखाद्या ग्रुपमधून अशी काही बातमी आल्यास ती पुढे पाठवू नका.

३) तुम्हाला एखादी आक्षेपार्ह पोस्ट सापडल्यास किंवा ग्रुप प्रमुखाने लक्षात आणून दिल्यास डिलीट करा.

४) कोणतेही छायाचित्र/बातमी/व्हिडिओ/मिम पोस्ट करण्याआधी त्याचा स्रोत आणि सत्यता पडताळून घ्या.

५) जर तुम्हाला एखाद्या चुकीच्या माहितीचा तुकडा, खोटी बातमी किंवा तिरस्कृत भाषण सापडले तर www. cybercrime.gov.in वर रिपोर्ट करा किंवा तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करा. तुमच्या ग्रुपच्या एडमीनलाही तात्काळ याची माहिती द्या.

६) धर्माच्या किंवा समूहाच्या विरोधातील हिंसक, अश्लील किंवा भेदभावात्मक अशी कोणतीच माहिती कधीच सामायिक करू नका.

ग्रुप सदस्य आणि ऍडमिन यांनी घ्यावयाची काळजी

ऍडमिन (ग्रुप प्रमुख) म्हणून ग्रुपवर माहिती टाकत असताना तुम्ही काय केलं पाहिजे?

१) तुमच्या ग्रुपमधील प्रत्येक सभासद माहिती सामायिक करण्यासाठी विश्वसनीय आणि जबाबदार आहेत का याची खात्री करून घ्या.

२) सगळ्या ग्रुप सभासदांना ग्रुपमधे माहिती पोस्ट करण्याच्या नियमांची माहिती द्या.

३) तुमच्या ग्रुप सभासदांना चेतावणी द्या आणि आक्षेपार्ह पोस्ट सामायिक करण्यासाठी (सगळ्यांपर्यंत पाठवण्यासाठी) प्रतिबंध घाला.

३) ग्रुपमध्ये सामायिक होणाऱ्या माहितीवर सतत आणि कार्यक्षमतेने लक्ष ठेवा.

४) जर ग्रुप अनियंत्रित होत असेल तर ग्रुपमध्ये केवळ ऍडमिन मेसेज टाकण्याची सेटिंग करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

५) जर एखादी व्यक्ती वाईट गोष्टींचा अवलंब करून आक्षेपार्ह माहिती सामायिक करत असेल तर पोलीस स्टेशनला लगेच माहिती द्या.

कायद्यानुसार या कारवाईला सामोरं जावं लागेल.

Leave a Comment