पुणे प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा इतर पक्षापेक्षा एक खासदार जरी जास्त असेल तर, राष्ट्रपती भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी सर्वप्रथम निमंत्रीत करतिल आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी वाट्टेल तेवढा वेळ देतील. असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले. ते पुणे येथे ‘मतदार जागृती परिषद’ या कार्यक्रमात बोलत होते.
‘मतदार जागृती परिषद’ आयोजित ‘लोकसभा निवडणुक आणि देशासमोरचे आव्हान’ या विषयावरील चर्चासत्र पुणे येथील आंबेडकर भवनात पार पडले. या चर्चासत्रात पत्रकार निरंजन टकले, समाजसेवक सुभाष वारे, आरोग्य सेना प्रमुख डॉ.अभिजित वैद्य तसेच इतिहास अभ्यासक सरफराज अहमद, मतदार जागृती परिषदेचे सदस्य प्रशांत कोठडीया, युक्रांदचे जांबुवंत मनोहर युक्रांद कार्यवाह संदीप बर्वे उपस्थित होते.
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, भारतमाता नष्ट कुणी केली? मतदारांनी या वेड्याला निवडून दिले. आणि त्याच वेड्याने नष्ट केली. जर्मनीचा विध्वंस वेडाचारामुळे झाला, तसा भारताचा विध्वंस वेडाचारामुळे होऊ नये. नाहीतर जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जाणारा भारत अशी ओळखच नष्ट होईल. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला परंतु बहुमत मिळाले नाही तर, राष्ट्रपती हे नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री पदासाठी शपथेला बोलावतील. आणि पाहिजे तेवढा वेळ बहुमत सिद्ध करण्यासाठी देतील. हा मोठा धोका आहे. म्हणून भाजपला हटवले पाहिजे.
नरेंद्र मोदी हे चौकातल्या मवाल्यासारखा वाह्यात बोलतात. याचा संदर्भ म्हणून त्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी भर सभेत केलेल्या ‘बोलो बोलो काँग्रेस की विधवा कौन’ वक्तव्याचा संदर्भ दिला. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ची घोषणा देणारे मोदी महिलांबद्दल असे अपमानजनक वक्तव्य कसे काय करू शकतात? असा सवाल सप्तर्षी यांनी केला. पुणे शहरात ज्या पक्षाचा खासदार त्या पक्षाचे केंद्रात सरकार असे सप्तर्षी यांनी आपल्या आजपर्यंतच्या निरिक्षणाचे समीकरण मांडले.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
नवनीत राणा अमरावतीतून लोकसभा लढवण्यास इच्छुक ? पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधान
अरविंद केजरीवाल यांनी घेतला मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू