राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक : मोदींनी केली ‘या’ पाच उमेदवारांशी चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपने चांगले यश मिळवले. आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असून त्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. राष्ट्रपतिपदासाठी जुलै महिन्यात, तर ऑगस्टमध्ये उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होणार आहे. भाजपकडून यंदा दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठी काहींना संधी देण्यात येणार आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच उमेदवारांसोबत चर्चा केली आहे.

भाजपच्यावतीने राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी काही उमेदवाराची नावेही चर्चेत आहे. त्यामध्ये लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, केरळचे राज्यपाल आरीफ महंमद खान, छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुइया उईके, झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, तेलंगणच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन आदींच्या नावांची चर्चा आहे. देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी यंदा पहिल्यांदाच आदिवासी महिलेला ही संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतक्या जणांचे होणार मतदान

राष्ट्रपती निवडणुकीतील मतांची एकूण संख्या 10.90 लाख इतकी आहे. 776 खासदार आणि देशभरातील 4 हजार 120 आमदार या निवडणुकीत मतदान करतील. एका खासदाराच्या मताचे मूल्य 708 इतके आहे, तर आमदारांच्या मतांचे मूल्य राज्यनिहाय असेल. उत्तर प्रदेशातील एका आमदाराच्या मताचे मूल्य 208 इतके आहे. कर्नाटकातील एका आमदाराच्या मताचे मूल्य 131 इतके आहे, तर सिक्कीमसारख्या छोट्या राज्यातील एका आमदाराच्या मताचे मूल्य अवघे सात इतके आहे.

अशी असते राष्ट्रपती निवडणूक मतदान प्रक्रिया

राज्याची एकूण लोकसंख्या म्हणजेच राज्यातील एकूण आमदारांची संख्या त्याला 1000 ने भागले जाते. ही लोकसंख्येची आकेडवारी 1971 च्या सेन्सस मधून घेतली जाते. आजघडीला देशातील राज्यांचा विचार करता उत्तर प्रदेशातील आमदारांच्या मतांचे मूल्य राष्ट्रपती निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 208 इतके आहे. तर गोव्यातील आमदाराचे मतमूल्य सर्वात कमी म्हणजेच 8 इतके आहे. खासदारांच्या मतांचे मूल्यही अशाच पद्धतीने ठरते. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती झाले तेव्हा प्रत्येक खासदाराचे मतमूल्य हे 708 इतके होते.