नवी दिल्ली | एकविसाव्या शतकामध्ये संपूर्ण जगावरती तोच देश राज्य करू शकेल त्याचा समुद्रावर दबदबा असेल. म्हणजेच जगावर आर्थिक आणि संपूर्ण ताकद प्राप्त करण्यासाठी भारतालाही समुद्राचा सिकंदर आणि ब्ल्यू इकॉनॉमीचा बादशाह होणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताला ब्ल्यू इकॉनोमी म्हणजेच निळ्या अर्थव्यवस्थेचा लीडर बनवण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असे मानने आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलियनपर्यंत पोहोचण्यासाठी या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
ब्लू इकॉनॉमी ही आर्थिक विकासासोबत भारताच्या सामरिक विकासामध्ये फायद्याची होणार आहे. तसे पाहिले तर ब्ल्यू एकोनोमी हा शब्द देशासाठी नवीन आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताला या नवीन इकॉनोमी बद्दल समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आणि या सोबतच हेही जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे की, ब्ल्यू इकॉनोमी देशासाठी किती मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरू शकते. पंतप्रधान मोदी यांनी 55 देशासोबत निळी क्रांती आणि ब्ल्यू इकॉनोमीसाठी आवाहन केले आहे. येत्या दहा वर्षांमध्ये यामध्ये तीन लाख कोटी रुपयांचे रुपयांची गुंतवणूक होऊ शकते. सोबतच देशातील 20 लाख युवकांना यामधून रोजगारही मिळू शकणार आहे.
‘मेरीटाइम इंडिया समिट’ ला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केले. तीन दिवस चालू असलेल्या या कार्यक्रमामध्ये 50 देश सहभागी झाले आहेत. भविष्य काळामध्ये भारताला समुद्रावर वेग पकडण्याचा हा एक रोडमॅप ठरणार आहे. सन 2030 पर्यंत भारताला समुद्रामध्ये आत्मनिर्भर बनवण्याचे लक्ष समोर ठेवले गेले आहे. या मिशनअंतर्गत महत्त्वाचे पाच पॉईंट अजेंडा तयार केले आहेत. हे पाच अजेंडा बॉईज म्हणजे, वर्ड क्लास पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे, व्यापाराला सोपे बनवण्यासाठी स्मार्ट पोर्ट बनवणे, लॉजिस्टिक कमी करणे, पोर्टसाठी संस्थागत आणि कायदेशीर बदल करणे, आणि समुद्र क्षेत्राला सुरक्षित आणि ग्रीन बनवणे असे आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.