हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण चांगलेच कमी झाले आहे. जवळपास कोरोना नाहीसा झाला आहे. लसीकरणामुळे हे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान याबाबत माहहती घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी राज्यात आता घराघरात लसीकरण मोहीम राबविण्यात यावेत, अशा सूचना मोदींनी केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यामधील मुख्यमंत्र्यांशी संवाद सोडला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात तसेच राज्यात सध्या कोरोनाचा प्रभाव कमी दिसत आहे. मात्र, लसीकरणाच्या मोहिमेला अजून वेग देवे गरजेचे आहे. आता ‘हर घर टीका, घर घर टीका’ याअंतर्गत लसीकरण मोहिम चालवली जाईल. लसीकरणासाठी आपापल्या राज्यात असलेल्या धर्मगुरुंची मदत घेण्यात यावी. धर्मगुरुंचे लसीकरणासंबंधीचे व्हिडीओ तयार करावेत. तसेच ते इतरत्र प्रसारित करण्यात यावेत.
100 वर्ष ही सर्वात मोठी महामारी देशाने अनेक आव्हानाशी सामना केला आहे. कोरोनाबरोबर लढाईत एक खास गोष्ट आहे आदी प्रत्येकवेळी आपण नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब केला आहे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांमध्ये वैक्सीनेशन वाढवण्यासाठी नवीन नावीन्यपूर्ण विचार आणि अधिक काम करावे लागणार आहे.
Review meet with districts where COVID-19 vaccination could pick pace. https://t.co/TReGpnL3bC
— Narendra Modi (@narendramodi) November 3, 2021
राज्यात ज्या ठिकाणी कमी प्रमाणात लसीकरण झालेले आहे. त्या ठिकाणी प्रभावीपणे लसीकरण मोहीम राबविण्यात यावी. या मोहिमेसाठी एनएसएस, एनसीसीची मदत घ्यावी. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन कवच कुंडल अभियान राबवून लसीकरण वळवले असल्याची माहिती औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी यावेळी दिली. यावेळी झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय या राज्यांच्या मुख्यमंत्र्यानी उपस्थिती लावली होती.