हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक-महाराष्ट्रातील सीमावाद हा चांगलाच पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र सीमावादाबाबत आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने महाराष्ट्रामध्ये नुकताच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सीमाभागा संदर्भात ठराव मंजूर करण्यात आला. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मध्यस्ती करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद थांबला नसल्याने आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बेळगावचा दौरा करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बेळगावचा दौरा करणार आहेत. सध्या महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या सीमावादावरून मोदींच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्नाटककडून होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून सीमावादाचा मुद्दा मिटवावा, अशी मागणी केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री शहांनी देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा जेली होती. मात्र, तरीही बोम्मईनी आपली आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवल्यामुळे यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः तोडका काढण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.
त्याचप्रमाणे मोदींच्या भेटीसाठी एकीकरण समितीने पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून हे पत्र पंतप्रधानांच्या सचिवांकडे वर्ग करण्यात आले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यात विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), तर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक या समितीचे सदस्य असतील.