विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराजबाबा चव्हाण की संग्राम थोपटे ? एकंदरीतच कल काय सांगतोय त्यासाठी वाचा ही बातमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यामुळे रिक्त झालेले विधानसभा अध्यक्ष पद नेमकं जातंय कुणाकडं असा प्रश्न आता सगळ्यांनाचं पडलाय. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू झाल्या असून, हे पद कॉंग्रेसकडेच राहणार असे सांगितले जाते. शरद पवारांनी देखील या संदर्भात “विधानसभा अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडेच राहील याला दुजोरा दिला होता.

त्यामूळे काँग्रेसच्या काही नेत्यांची नावं सध्या समोर येत आहेत त्यात आघाडीवर नाव आहे ते संग्राम थोपटे, के. सी. पाडवी यांचं पण या दोन नावांची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र पृथ्वीराज चव्हाण यांची या पदावर निवड व्हावी, असे वाटते. म्हणून या शर्यतीत आता संग्राम थोपटे,के. सी. पाडवी आणि पृथ्वीराज चव्हाण ही तीन नावं चर्चेत आहेत. आता दिल्लीश्वर कुणाच्या पारड्यात हे पद टाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पण तरी पृथ्वीराज बाबांचं दिल्ली दरबारी वजन पाहता त्यांनाच हे पद मिळण्याची शक्यता आहे असं मत एका दिल्लीस्थित माध्यमप्रतिनिधिने नोंदवलं आहे.

नेमकं काय असतं विधानसभा अध्यक्षपद

विधानसभा अध्यक्ष हे प्रत्येक व्यापक अधिकार असणारं पद आहे. प्रत्येक सत्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारी विधानसभा अध्यक्षकडे असते. सगळ्याचं आमदारांचे प्रश्न ऐकून त्याची नोंद घेणे, आमदारांचे म्हणणे ऐकून घेणे तसेच विधानसभा परिसरात सर्वोच्च जबाबदार व्यक्तिमत्त्व हे विधासभा अध्यक्षाचं असतं. परिणामी अनुभवी आणि जेष्ठ व्यक्तिमत्त्व या पदावर असावा असा संकेत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment