मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निडणुकीच्या सोबत लागणार आहे. त्यामुळे उदयनराजे यांना तोडीस तोड उमेदवार म्हणून राष्ट्रवादीने हि जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या जागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उभा राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
[youtube https://www.youtube.com/watch?v=fnU1IHkp9iY&w=560&h=315]
सातारा लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी करणार आहेत का असा प्रश्न, पृथ्वीराज चव्हाण यांना मागील काही दिवसापूर्वी विचारण्याचा आला होता. त्यावेळी त्यांनी आपण कराड दक्षिण विधानसभेतून विधानसभेवर जाण्यास इच्छुक आहे. आपण लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नाही. मात्र पक्षाकडून जो आदेश दिला जाईल तो आदेश मला मान्य राहील असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पक्ष सातारा लोकसभा लढवण्याचा आदेश देऊ शकते.
शरद पवार आणि सोनिया गांधी यांची मागे भेट झाली होती. त्या भेटीत शरद पवार यांनी सातारची जागा काँग्रेसला सोडण्यास अनुकूलता दाखवली होती. त्यामुळे अवघ्या काही तासात पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवार असताना देखील राष्ट्रवादीने हि जागा नलढवण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र उदयनराजेंना ठस्सल देऊ शकतील असे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला. त्याच प्रमाणे श्रीनिवास पाटील तेवढे तुल्यबळ नवाटल्याने राष्ट्रवादीने साताऱ्याची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.