आता भविष्यात राज्यासह देशभर दंगली घडण्याची भीती : पृथ्वीराज चव्हाण

_Satara News Prithviraj Chavan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके                                                                                            हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूरात केलेल्या आंदोलनावेळी दगडफेक झाल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. या घटनेवरून काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला. “भाजपकडून द्वेष आणि दंगली घडवून आणल्या जात आहेत. कोल्हापूरात दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला पण त्यावर नियंत्रण आणण्यात यश आले आहे. मात्र, आम्हाला भीती आहे कि राज्यभर, देशभर भविष्यात दंगली घडतील, अशी चिंता चव्हाण यांनी व्यक्त केली.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चव्हाण म्हणाले की, देशात द्वेषाचे वातावरण तयार केल्या शिवाय भाजपला यश मिळत नाही. रामनवमीच्या काळात ज्या काही दंगली झाल्या. त्यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या कोणामुळे झाल्या. या ठिकाणी झालेल्या दंगली पूर्वनियोजित होत्या.

देशात व राज्यात ठिकठिकाणी भाजपकडून द्वेष आणि दंगली घडवून आणल्या जात आहेत. अल्पसंख्यांक समाजाला भयभीत केले जात आहे. राज्य सरकारला कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवता आले नाही. कोल्हापूरमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला पण त्यावर नियंत्रण आणण्यात यश आले आहे. मात्र, आम्हाला भीती आहे राज्यभर आणि देशभर भविष्यात दंगली घडतील, असे चव्हाण यांनी म्हंटले.