हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून आपली भूमिका मांडली जात आहे. दरम्यान काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमात राहुल गांधी व सावरकर यांच्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. ‘कोणत्याही ऐतिहासिक पुरुषाकडे आजच्या स्थितीतून पाहताना प्रत्येकाने फार सावधगिरी बाळगली पाहिजे. देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी सत्तेत असताना सावरकरांना मानत त्यांच्या नावाचं तिकीट काढलं होतं हे विसरता कामा नये,” असे चव्हाण यांनी म्हंटले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत आपले मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, ज्याप्रमाणे इतिहासाचे अभ्यासक एखाद्या ऐतिहासिक घटनेकडे पाहतात त्याचप्रमाणे सामान्य माणूस बघत नाही. आपल्याला जे सोयीस्कर वाटते तेच तो पाहतो आणि त्यावरून आपले मत बनवतो. इतिहासातील कोणत्याही व्यक्तीकडे पाहिले तर त्याच्यात काहीतरी गुण-दोष असतात. त्याच्यातील गुण-दोषांचे योग्य मूल्यमापन झाले पाहिजे. एखाद्याने चांगलयाप्रकारचे काम, कार्य केले असेल तर चांगलेच म्हंटले पाहिजे.
शिवराय जुन्या काळातील आदर्श; राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/1wImVwG3UF#hellomaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 19, 2022
देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी या ज्यावेळी सत्तेत होत्या. त्यावेळी त्यांनी सावरकर यांच्या नावाचे तिकीट काढले होते. सावरकरांनी इंग्रजांना माफीची पत्र लिहिली होती, नंतरच्या काळात त्यांना इंग्रजांकडून पेंशनही मिळत होती. मात्र, दुसऱ्या बाजूला त्यांनी जे योगदान दिले आहे तेही विसरता येणार नाही. त्यामुळे मूल्यमापन करताना ब्लॅक अँड व्हाइट अशा प्रकारे मूल्यमापन करू नये, असे चव्हाण यांनी म्हंटले.