नवी दिल्ली |लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा कॉंग्रेसच्या वर्किंग कमेटीकडे सादर केला आहे. या राजीनाम्यासंदर्भात कॉंग्रेस वर्किंग कमिटीने एक बैठक देखील घेतली आहे. या बैठकी नंतर आता आणखी एक बैठक पार पडणार आहे. या बैठकी नंतर पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी अंतिम करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मोहिते पाटलांच्या अकलूजमध्ये भाजपला पडली एवढी मते
पृथ्वीराज चव्हाण यांची स्वच्छ प्रतिमा आणि हुशार व्यक्तिमत्व या गुणांमुळे त्यांची या पदी निवड केली जावू शकते. त्याच प्रमाणे पृथ्वीराज चव्हाण यांचे संयमी नेतृत्वच पक्षाला पुढे घेवून जावू शकते असे देखील बोलले जाते आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी या आधी संघटनात्मक पद सांभाळले नसल्याने त्यांना या पदी बसवले जाईल का या बद्दल शशांक देखील आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत सचिन पायलट आणि ए. के. अन्थनी यांची देखील नावे राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत.
मोदींच्या शपथविधी पासून पाकिस्तानला ठेवले दूर
याआधी देखील कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष पदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांची कॉंग्रेसच्या सचिव पदी निवड करण्यात आली आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेतून मागे पडले. मात्र आता पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर राहणार आहे. कारण त्यांचे प्रतिस्पर्धी बघता पृथ्वीराज चव्हाण हे तगडे मानले जातात.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
विखे-थोरात वादात नवी ठिणगी ; संगमनेरमध्ये फाडले सुजय विखेंचे बॅनर
लठ्ठपणावरून होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
परशाची आर्ची १२ वीला झाली पास ; मिळाले एवढे टक्के गुण
विधान परिषद पोटनिवडणूक : या नेत्याला भाजपने दिली उमेदवारी
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार ; कॉंग्रेस आघाडीला मिळणार एवढ्या जागा