हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासदार शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती होत असल्याची घोषणा केली. त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या घोषणेवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्ती घेतली तरी देखील त्यांचं राजकारणात महत्वाचं स्थान राहील, असे चव्हाण यांनी म्हंटले.
खासदार शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारीत आवृत्तीचे मुंबईत आज प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. यावेळी चव्हाण म्हणाले की, शरद वार यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतरही त्यांच पक्षातील स्थान महत्वाचं राहणार आहे.
शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले की, pic.twitter.com/XQdHUBmRy8
— santosh gurav (@santosh29590931) May 2, 2023
आमच्या काँग्रेस पक्षात जेव्हा सोनिया गांधी अध्यक्ष होत्या. त्यामुळे आज शरद पवार यांनी देखील राजीनामा दिला असला तरी त्यांच राजकारणातील पक्षातील महत्व, स्थान कायम राहणार आहे, असे चव्हाण यांनी म्हंटले.