Tuesday, January 7, 2025

प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असल्याने त्याच्या संपर्कांत इतरांनाही कोरोनाची लागण झाल्याची शंका व्यक्त केली जात होती. दरम्यान आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रियांका गांधी यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

प्रियांका गांधी यांनी त्यांच्या ट्विट म्हंटले आहे की, “मी सौम्य लक्षणांसह COVID-19 साठी सकारात्मक चाचणी केली आहे. सर्व प्रोटोकॉल पाळत मी स्वतःला घरी क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना मी सर्व आवश्यक खबरदारी घेण्याची विनंती करत आहे,” असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस नेत्यासोबत बैठका सुरु होत्या. यावेळी प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत होत्या. दरम्यान, या भेटीगाठी व बैठकांमुळे सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आता प्रियांका गांधी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले.