हुश्श..! पुण्यातील एकाच कुटुंबातील ५ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत भर टाकत आहे. या सर्व तणावाच्या परिस्थितीत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोरोनाची लागण झालेले एकाच कुटुंबातील ५ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण आहे. मात्र, ५ रुग्ण बरे झाल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

पुण्यात एकाच कुटुंबात राहणाऱ्या ५ जणांमध्ये करोनाची लक्षण आढळून आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या सर्वांच्या कोरोना टेस्ट केल्या असता त्यांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. १४ दिवसांचा उपचाराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पुन्हा टेस्ट करण्यात आल्या. दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या. त्यामुळे या पाचही जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता पुणे शहरात एकूण २३ जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, राज्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या राज्यात १ हजार १३५ जण करोनाग्रस्त असल्याचं सांगण्यात येत आहे. यापैकी ११७ जण करोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –