पुणे प्रतिनिधी । मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यात पुणे शहरात १७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णामुळं पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुणे पिंपरी -चिंचवडमध्ये करोनाग्रस्तांचा आकडा आता १०३ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत पुण्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या रोज वाढत असून रविवारी सकाळी १२ वाजेपर्यंत ही संख्या ६६१ वर गेली. राज्यात सर्वाधिक करोना रुग्णांची संख्या मुंबईत आहे. मुंबईत आतापर्यंत ३७७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुणे १०३, ठाणे ७७, सांगली २५, नागपूर १७, अहमदनगर २०, लातूर ८, बुलडाणा ८, सातारा ३, औरंगाबाद ५, उस्मानाबाद ३, कोल्हापूर २ अशी सर्वाधिक नोंद झालेल्या राज्यातील इतर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६६१ वर, तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण?
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
सावधान! आज दिवे लावण्याआधी सॅनेटायझर वापरू नका, नाही तर..
पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला
राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत
अंडरवर्ल्ड डाॅनची क्वीन’वर नजर; पॅरोलवर सुटताच डॅडी अरुण गवळीचा नवा ‘गेम
उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..