पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. सध्या काही ठिकाणी रुग्ण प्रमाणात घट होत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी रूग्णसंख्या कमी असलेल्या शहर आणि ग्रामीण ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत शहरातील नव्या निर्बंधांबाबतची माहिती दिली आहे. या नव्या निर्बंधांनुसार पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व दुकानांना परवानगी !
पुणे मनपा हद्दीतील सर्व दुकाने उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु करण्यास परवानगी दिली असून शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. PMPML, हॉटेल्स, उद्याने, जिम आदी आस्थापना बंदच राहतील.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 31, 2021
पुण्यात उद्यापासून काय सुरु राहणार?
1. सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत पुण्यात सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार आहेत.
2. शासकीय कार्यालये 25 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत.
3. रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल/घरपोच सेवेसाठी दिनांक 14 एप्रिलच्या आदेशानुसार सुरु राहतील.
4. पुणे महानगर पालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरु राहणार आहेत.
5. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
6. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील.
7. ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू (Essential / Non-essential) यांची घरपोच सेवा (Home Delivery) सुरु करणेस मुभा राहील.
पुणेकरांनो, माझी कळकळीची विनंती…
पुणे शहरात आपण बहुतांशी निर्बंध शिथिल केलेले असले तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. आपल्याला तिसरी लाट सामूहिकपणे रोखायचीय, पण ते तुम्हा सर्वांच्या साथीशिवाय शक्य नाही. बाहेर वावरताना प्रचंड काळजी घ्या. स्वतः सुरक्षित राहा, कुटूंबालाही ठेवा !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 31, 2021
पुण्यात काय बंद असणार?
1. पुण्यातील उद्याने, मैदान, जिम, मंगल कार्यालय, पीएमपीएमएल बससेवा बंद राहणार आहे.
2. शनिवार आणि रविवार सकाळी 7 ते 2 यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार, अन्य दुकाने बंद ठेवली जाणार आहेत.
3. दुपारी तीन वाजल्यानंतर नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
महापौरांनी केले आवाहन
दरम्यान, शहरातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.