पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील नवले ब्रिजवर एक विचित्र अपघात (accident) झाला आहे. यामध्ये एकदा भरधाव टँकर एकदोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने हा भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातामुळे नवले ब्रिजवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. टँकरचा ब्रेक फेल झाल्याने अपघातग्रस्त टँकर अनियंत्रित झाला आणि त्याने एकामागून एक वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अनेकजण जखमी झाले असल्याचे पोलिस आणि अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.
काय घडले नेमके?
पुणे शहरातील कायम व्यस्त असलेल्या नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातामध्ये (accident) 48 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, पीएमआरडीए,अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्याला सुरुवात केली. गर्दीच्याच वेळी नवले पुलावर ब्रेक निकामी झाल्याने भरधाव आलेल्या टँकरने अनेक वाहनांना धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.
पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात; अपघातात तब्बल 48 वाहनांचे नुकसान pic.twitter.com/zEwk3y6cvM
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) November 21, 2022
यावेळी अपघातात जखमींना नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील नवले ब्रिज येथे आज रात्री टँकरच्या धडकेने झालेल्या अपघातात (accident) अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त झाली.या अपघाताची माहिती कळताच तो नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते शोधण्याचे तात्काळ निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!