पुणे प्रतिनिधी | पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आहे अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
Pune: Water logging in parts of Indapur following heavy rainfall in the district. #Maharashtra pic.twitter.com/nXAuoQmkrk
— ANI (@ANI) October 14, 2020
पुणे शहरात दुपारी २.३० पासून पाऊस सुरू आहे. रात्री ११ वाजेपर्यंत हवामान विभागाने केलेल्या नोंदीनुसार कात्रज भागात १४२ मि.मी, खडकवासला भागात १०८ मि.मी., वारजे येथे ६३ मि.मी व कोथरूड येथे ६७ मि.मी पावसाची नोंद केंद्रात करण्यात आली आहे.
सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. कृपया या भागातून जाण्याचे टाळावे !#पुण्याचा_पाऊस #PuneRains
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 14, 2020
तसेच दांडेकर पुलालगत सर्व्हे नंबर १३३ मधील काही नागरिकांना साने गुरुजी शाळा आणि मनपा कॉलनी शाळा या दोन्ही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. आंबील ओढा परिसरात आपल्या पुणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम आणि अग्निशमन दलाची पथके सज्ज असून पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ओढ्याच्या लगत असणाऱ्या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये आणि काही घरांमध्ये पाणी शिरलेले आहे.
पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 14, 2020
आपण सुरक्षित ठिकाणी थांबा, घराबाहेर पडू नका !
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या दोन दिवसांसाठी हा अॅलर्ट आहे. रात्री उशिराच्या नोंदीनुसार कात्रज भागात १०० मिमी इतका पाऊस पडला आहे. महापौर मोहोळ यांनी नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यात संततधार! खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 14, 2020
वाचा सविस्तर👉🏽 https://t.co/dcji907gC9#Pune #punerains #Rainfall #HelloMaharashtra