मुंबई | माजी राज्यमंत्री, जेष्ठ नेते मा. शिवाजीराव नाईक यांचा बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील प्रवेश त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने निश्चित झाला. पश्चिम महाराष्ट्रात शिराळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीत जाणार असल्याने हा भाजपला मोठा धक्का मानावे लागणार आहे.
शिवाजीराव नाईक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी खासदार पवार म्हणाले, आपण सगळे पूर्वीं एकाच विचाराने काम केले आहे. आता पुन्हा एकत्र येऊन अधिक जोमाने काम करूया. आज शिवजीरावांनी वाढदिवसा दिवशीच राष्ट्रवादी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. यावेळी झालेल्या चर्चेनुसार मा. खासदार पवारसाहेब व इतर मान्यवरच्या उपस्थित २ एप्रिल २०२२ शिराळ्यात भव्य शेतकरी मेळावा घेऊन प्रवेश होईल.
यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, माजी जिल्हा परिषद रणधीर नाईक, सत्यजीत नाईक, अभिजीत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.