मुंबई प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारेही वाहू लागले आहे . आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला . रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक रघुवीर देशमुख यांनीही आपल्या कुटुंबासोबत शिवसेनेत प्रवेश केल्याने तटकरे यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
रघुवीर देशमुख यांचेसोबत त्यांच्या पत्नी सौ. माधवी देशमुख, राज देशमुख, रोहन देशमुख यांनीही शिवबंधन हाती बांधले आहे. महाडचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा फायदा येत्या निवडणुकीत भरत गोगावले यांना होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
रायगड विभागामध्ये विकासाला चालना देण्याकरिता आपण शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे रघुवीर देशमुख यांनी म्हटले आहे . तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या परिवाराविषयी आपल्याला आदर असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सुनिल तटकरे यांच्या विजयात रघुवीर देशमुख यांचा मोलाचा वाटा होता. मात्र आता देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सेनेला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे .
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच आताही कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप –सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस – राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.
विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF
WhatsApp Nambar – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur