पुणे : काही मुलं गतिमंद असतात अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अभिनेते शरद पोंक्षे यांनी टीका केली “मला तर त्याचे आभार मानायचे आहेत. मी त्याच्यावर चिडत नाही. काही मुलं गतिमंद असतात. उलट मी त्याचे आभार मानतो,” असा उपहासात्मक टोला शरद पोंक्षे यांनी लगावला आहे.पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही सर्व सावरकर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सावरकर विचार दर्शन या विषयावर ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका सभेत माझं आडनाव सावरकर नाही, गांधी आहे,मी माफी मागणार नाही असे विधान राहुल गांधी यांनी केले होते.रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, या भाजपाच्या मागणीवर राहुल गांधी यांनी हे भाष्य केले होते. शरद पोंक्षे यांनी यावेळी बोलताना राहुल गांधी यांचा दिल्लीमधील शेंबडा मुलगा असा उल्लेख केला.