हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतेच इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. तर काही वृत्तपत्रांच्या बातम्या दाखवून राहुल गांधी यांनी हे आरोप कसे सत्य आहेत याचे पुरावे माध्यमांना दाखवले आहेत. तसेच, नरेंद्र मोदींनी अदानींना एवढी मोकळीक का दिलीय? असा प्रश्न देखील राहुल गांधी यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना, “पंतप्रधान मोदींच्या जवळच्या सहकाऱ्याने शेअर्ससाठी अब्जावधी डॉलर्स वापरले. यात प्रश्न असा आहे की हा पैसे कोणाचा आहे? अदानींचे की अन्य कोणाचे? याची चौकशी झाली पाहिजे. पंतप्रधान मोदींच्या जवळच्या सहकाऱ्याने शेअर्ससाठी अब्जावधी डॉलर्स वापरले. यात प्रश्न असा आहे की हा पैसे कोणाचा आहे? अदानींचे की अन्य कोणाचे?” असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर, “सेबीचा चेअरमन अदानी यांना क्लीनचीट देतो आणि नंतर अदानी यांच्या कंपनीत डायरेक्टर बनतो. हा आंतरराष्ट्रीय विषय आहे. या सर्व घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का करत नाहीत? नरेंद्र मोदी आणि अदानी यांचं नातं आहे, असं वृत्तपत्र म्हणत आहेत. काय नातं आहे? ते त्यांनी जाहीर करावं. ईडी अदानी यांच्यावर रिसर्च का करत नाही? हा मोठा सवाल आहे. भारताच्या इभ्रतीचा विषय आहे” अशी टीका राहूल गांधींनी मोदींवर केली आहे.
दरम्यान, अदानी कुटुंबाने आपल्या शेअरमध्ये स्वत:चे पैसे गुंतवून गैरव्यवहार केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत लावला आहे. हे आरोप करत त्यांनी काही वृत्तपत्रांचे पुरावे देखील सादर केले आहेत. तसेच, अदानी कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये दोन परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचा आरोप देखील राहूल गांधी यांनी केला आहे. सध्या सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी नरेंद्र मोदींवर तोफ धाडताना दिसत आहेत.