हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधातदेशभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसेनंतर आरोप-प्रत्यारोप होत असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशातील बहुतेक शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांची माहिती नाही. नाही तर संपूर्ण देश पेटून उठेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी हे वक्तव्य त्यांचा मतदारसंघ वायनाड येथील कलपेट्टा येथील सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान केले
वास्वत हे आहे की देशातील बहुतेक शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांविषयीची माहिती नाही. या कायद्यातील तरतूदींची त्यांना माहिती नाही. त्यांना जर या कायद्याची माहिती झाली तर संपूर्ण देशात आंदोलन होईल. संपूर्ण देशाला आग लागेल, असं राहुल यांनी म्हटलं आहे. राहुल यांनी महात्मा गांधी यांचं एक वाक्य ट्विट करून कृषी कायदे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली. महात्मा गांधी म्हणाले होते, विनम्रपणे विरोध करून तुम्ही जग हादरवून सोडू शकता… माझी विनंती आहे की केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, असं राहुल यांनी म्हटलं आहे.
देशातील आजची परिस्थिती तुम्ही जाणून आहात. केवळ 2-3 बड्या उद्योगपतींच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. आज प्रत्येक उद्योगावर 3-4 उद्योगपतींचा एकाधिकार आहे, असं सांगतानाच केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’