काश्मीरच्या बर्फवृष्टीत राहुल गांधींचे भाषण; भारत जोडो यात्रेचा समारोप

rahul gandhi jammu kashmir
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वाखालील भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज जम्मू काश्मीर येथील श्रीनगरमध्ये समारोप झाला. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही पदयात्रा नक्कीच सर्वाना थक्क करणारी ठरली. यावेळी श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर बर्फवृष्टीतच राहुल गांधींनी जनतेला संभोधित करताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्याविषयी बोलताना राहुल गांधी भावुक झाल्याचे पाहायला मिळालं.

राहुल गांधी म्हणाले, जम्मू-काश्मीरच्या लोकांनी मला ग्रेनेड दिले नाही, त्यांनी मला प्रेम दिले आहे. मी गांधीजींकडून शिकलो आहे की जर तुम्हाला जगायचे असेल तर तुम्हाला न घाबरता जगावे लागेल. मी चार दिवस इथे असाच फिरलो. जम्मू-काश्मीरच्या लोकांनी मला बॉम्ब दिला नाही. त्यांनी मला दिलखुलास प्रेम दिलं. प्रेमाश्रूंनी माझे स्वागत केले असं म्हणत राहुल गांधीनी काश्मीरवासियांचे आभार मानले.

गेल्या अनेक वर्षांपासून ते रोज 8-10 किलोमीटर धावत आहेत. अशा परिस्थितीत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालणे इतके अवघड जाणार नाही, असे त्यांना वाटले. ते पुढे म्हणाले, लहानपणी फुटबॉल खेळताना माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती. कन्याकुमारीहून प्रवास सुरू झाला तेव्हा गुडघ्यात वेदना होत होत्या, पण नंतर काश्मीरमध्ये आल्यावर ही वेदना संपली.

मी 14 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या आज्जीला गोळी मारण्यात आली. त्यावेळी मला शाळेतून उचूलन नेले, मी माझ्या आज्जीच्या रक्ताची जागा पाहिली. पप्पा आले, आई आली. आई तर पूर्ण हादरली होती, ती बोलू शकली नाही. जो हिंसाचार करतो त्यांना या वेदना समजू शकत नाहीत. वेदना आपण समजू शकतो. आपल्या माणसांना गमावल्याचे दुःख आम्ही समजू शकतो माझी बहीण प्रियांका समजू शकते असं सांगताना राहुल गांधी भावुक झाल्याचे पाहायला मिळालं.

मी जस चार दिवस जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) मध्ये चार दिवस पायी प्रवास करू शकलो त्यासारख भाजपचा कोणताही नेता चार दिवस पायी प्रवास करू शकत नाही. याचे कारण जम्मू-काश्मीरचे लोक त्याला फिरू देणार नाहीत म्हणून नव्हे, तर भाजपचे लोक घाबरले आहेत म्हणून ते चालू शकत नाहीत असं म्हणत त्यांनी भाजप आणि RSS वर टीका केली. भाजप नेत्यांनी या यात्रेदरम्यान, माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला पण त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असा टोलाही त्यांनी लगावला.