राहुल गांधींनी ‘त्या’ 20 हजार कोटींवरून मोदी- अदानींना घेरलं; सरकार उत्तर देणार का?

rahul gandhi modi adani
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे? असं वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली तसेच लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी सुद्धा रद्द केली आहे. त्यांनतर आज प्रथमच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताच्या लोकशाहीसाठी मी लढतच राहणार आहे असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचं एकमेकांशी नातं काय आहे? अदानी यांच्या शेल कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? अशी प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचे आणि अदानी यांचे संबंध आहेत. गौतम अदानी यांना वाचवण्यासाठी संपूर्ण भाजप का उभा आहे? अदानी यांच्या खोट्या कंपन्यात कोणीं पैसे गुंतवले असा प्रश्न राहुल गांधींनी केला. अदानी यांना मोदी सरकारने 6 विमानतळे दिली. यासाठी सरकारने नियमामध्ये बदल केला. अदानी यांच्या शेल कंपन्यांमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक कोणी केली? हा पैसे कोणाचा? असा सवाल राहुल गांधींनी केला तसेच ज्याचा हा पैसा आहे त्याला जेलमध्ये टाका असेही राहुल गांधी यांनी म्हंटल.

हे 20 हजार कोटींचे प्रकरण बाहेर येईल म्हणून सरकार घाबरलं. पण केंद्र सरकार माझा आवाज दाबू शकत नाही. माझी खासदारकी रद्द करून तुम्ही मला गप्प करू शकत नाही असं म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकारला ललकारले. भारताच्या लोकशाहीसाठी मी लढतोय आणि माझा हा लढा कायम सुरु राहील. माझं नाव सावरकर नाही तर गांधी आहे, त्यामुळे मी माफी मागणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले.