नफरत के बाजार में हम मोहब्बत की दुकान खोल रहे है…; भारत जोडो यात्रेत राहुल गांधींचं वक्तव्य

Rahul Gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “माझ्या या भारत जोडो यात्रेत तुम्हाला कुठेही द्वेष दिसणार नाही. कारण इथे सगळ्या धर्माचे लोक आहेत. माझं कुणाशीही वैर नाही. पण एका विचारधारेविरोधात संघर्ष सुरु आहे. इथे द्वेषाचा बाजार आहे आणि माझं दुकान प्रेमाचं आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.

भारत जोडो यात्रेने आज दिल्लीत प्रवेश केला. आज ही यात्रा लाल किल्ल्यावर धडकणार आहे. तत्पूर्वी राहुल गांधी यांची बदरपूर बॉर्डरवर नुकतीच सभा पार पडली. यावेळी सभेत राहुल गांधी म्हणाले, कधी कधी त्यांचे नेते विचारतात, राहुल गांधी का चालत आहेत? मी विचार केला आणि उत्तर मिळाले. तुम्ही माझा द्वेष करा, मला शिव्या द्या. तुमचा बाजार.. महात्मा गांधी, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, आंबेडकर या सर्वांनी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडलं होतं. त्यामुळे या सगळ्या भाजप नेत्यांना मी आज आवाहन करतो. तुम्हीदेखील या बाजारात या, आपल्या देशात द्वेषात कुणीही जगू नये…अशी माझी इच्छा आहे.

आज दुपारी 4.30 वाजता ही राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा लाल किल्ल्यावर दाखल होईल. कोरोनाचा संसर्गावर आळा घालण्यासाठी यात्रेत सहभागी होणारे नेते आणि कार्यकर्त्यांना मास्क घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हरियाणातील फरीदाबाद येथून एनएचपीसी मेट्रो स्टेशनवरून ही यात्रा सुरु झाली. आज दुपारी लाल किल्ल्यावर मोठ्या सभेसमोर राहुल गांधी भाषण करणार आहेत.